शहरात दोन अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू

अपघातानंतर ट्रकचालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
शहरात दोन अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू

मुंबई : शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सुप्रिया सखाराम घाग (५८) आणि रणजीत रमेशकुमार चावरिया (३५) यांचा समावेश आहे. याप्रकरणी वडाळा टी टी आणि मेघवाडी पोलिसांनी अपघाताची नोंद करून पळून गेलेल्या चालकांचा शोध सुरू केला आहे. पहिला अपघात बुधवारी रात्री उशिरा सव्वाबारा वाजता शीव येथील आणिक आगार डेपोजवळ झाला. मृत रंजीत हा बुधवारी रात्री त्याच्या बाईकवरून वडाळा-चेंबूर लिंक रोडने चेंबूरकडून प्रतिक्षानगरच्या दिशेने येत होता. आणिक आगार डेपोजवळ येताच एका मिक्सरने त्याच्या बाईकला धडक दिली होती. त्यात तो जखमी झाल्याने त्याला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर चालक तेथून पळून गेला होता. दुसरा अपघात मंगळवारी ३१ ऑक्टोबरला दुपारी बारा वाजता जोगेश्‍वरीतील पश्‍चिम दुतग्रती महामार्गावरील जेव्हीएलआर, प्रतापनगर सिग्नलजवळ झाला. संतोष सखाराम घाग हा जोगेश्‍वरीतील मसाजवाडी परिससरात राहत असून, मृत सुप्रिया ही त्याची आई आहे. मंगळवारी पावणेबारा वाजता संतोष हा त्याची आई सुप्रिया यांच्यासोबत त्याच्या अॅक्टिव्हा बाईकवरून गोरेगाव येथे जात होते. प्रतापनगर सिग्नलजवळ येताच मागून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या बाईकला जोरात धडक दिली होती. त्यात त्याच्यासह सुप्रिया या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. जखमी झालेल्या दोघांनाही पोलिसांनी तातडीने जवळच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही वेळात तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in