अडीच कोटींच्या चोरीप्रकरणी दोन नोकरांना अटक

हा प्रकार नंतर उघडकीस येताच सुनीता झव्हेरीने खार पोलिसांना माहिती दिली होती.
अडीच कोटींच्या चोरीप्रकरणी दोन नोकरांना अटक

मुंबई : अडीच कोटींच्या सोन्यासह हिरेजडित दागिन्यांच्या चोरीप्रकरणी दोन नोकरांना खार पोलिसांच्या एका विशेष पथकाने बिहार येथून अटक केली. राजा ऊर्फ नीरज यादव आणि शत्रुघ्न ऊर्फ राजू कुमार अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सुनीता विजय झव्हेरी ही महिला खार परिसरात राहत असून त्यांचा ज्वेलरी बनविण्याचा कारखाना आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याकडे नीरज यदव आणि राजू कुमार हे दोन नोकर कामावर होते. १० फेब्रुवारीला या दोघांनी सुनीतासह तिची मुलगी आणि वयोवृद्ध नणंदला जेवणातून गुंगीचे औषध दिले होते. ते तिघेही बेशुद्ध होताच त्यांनी कपाटातील सुमारे अडीच कोटींचे दागिने घेऊन पलायन केले होते. हा प्रकार नंतर उघडकीस येताच सुनीता झव्हेरीने खार पोलिसांना माहिती दिली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही नोकरांविरुद्ध चोरीसह अन्य भादंवि कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in