लेप्टोच्या दोन संशयित रुग्णांचा बळी

त्याला ‘बिपॅप’ यंत्रणा लावली होती
लेप्टोच्या दोन संशयित रुग्णांचा बळी

मुंबई : परळच्या केईएम रुग्णालयात गेल्या दहा दिवसात आणखी दोन संशयित लेप्टोस्पायरोसिस रुग्णांचा बळी गेला आहे. रुग्णालयाची मृत्यू परीक्षण समिती या रुग्णांच्या वैद्यकीय इतिहास तपासून पाहिल्यानंतर

त्यांचे लेप्टोने निधन झाले का ? याचा निर्णय घेतला जाईल, असे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

केईएमच्या औषध विभागाने सांगितले की, २१ वर्षीय पुरुष व ५९ वर्षीय पुरुषाला १० व १८ ऑगस्ट रोजी प्रकृती चिंताजनक असल्याने आयसीयूत भरती केले होते.

यंदा १ मे ते १३ ऑगस्ट दरम्यान लेप्टोचे ६६१ रुग्ण सापडले. त्यातील ३ संशयितांचा मृत्यू झाला आहे.

केईएमच्या औषध विभागाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लेप्टो पॉझिटिव्ह असलेले दोन रुग्ण चिंताजनक अवस्थेत रुग्णालयात भरती केले होते. मुलुंडच्या खासगी रुग्णालयातून २१ वर्षीय मुलाला तातडीने केईएममध्ये हलवण्यात आले होते. त्याला ‘बिपॅप’ यंत्रणा लावली होती. या रुग्णाला ताप व श्वास घेण्यास त्रास होत होता. शिवाय त्याचे अवयव ४० मिनीट (बीपी) रेकॉर्ड करण्यायोग्य नसल्यामुळे त्याला ताबडतोब व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आम्ही चार वेळा त्याचे सीपीआर केले. प्रतिजैविके देण्याबरोबरच त्याला वेसोप्रेसर सपोर्ट देण्यात आला. त्यानंतर त्याला पुन्हा सीपीआर देण्यात आला, परंतु ११ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजता रुग्णाचा मृत्यू झाला,” डॉक्टरांनी सांगितले.

५९ वर्षीय पुरुषाला ह्रदयाशी संबंधित आजार होता. त्यालाही १३ ऑगस्टला आणीबाणीच्या परिस्थितीत केईएमला आणले. त्याला ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याने बाहेर चाचणी केली तेव्हा मलेरिया झाल्याचे आढळले होते. तर रुग्णालयातील चाचणीत त्याला लेप्टोस्पायरोसिस असल्याचे निदान झाले. तसेच त्याच्या मूत्रपिंडाला जखम झाली होती. त्याला तातडीने इर्मजन्सी आयसीयूत हलवले. त्याला मलेरियावरील औषधे देण्यात आली. तसेच वेंटीलेटरवर ठेवले. त्यानंतर त्याला सेप्टिक झाले. अखेर १८ ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी या संशयित मृत्यू व त्यांचे आरोग्य अहवाल हे मृत्यू लेखा परीक्षण समितीकडे पाठवले आहेत. या अहवालाची तपासणी केल्यानंतर ते रुग्ण लेप्टोस्पायरोसिसने मरण पावले का? हे जाहीर केले जाईल. या रुग्णांना सहव्याधी होत्या. त्यातील एका रुग्णाला मलेरिया होता. त्यानंतर त्याला लेप्टोस्पायरोसिस झाल्याचे निदान झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in