दोन तृतीयांश महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही नाही

फेब्रुवारी २०२४ पर्यंत महिलांच्या सर्व डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले
दोन तृतीयांश महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही नाही

मुंबई लोकलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या लोकलमधील दोन तृतीयांश महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे उघड झाले आहे. मात्र, फेब्रुवारी २०२४ पर्यंत महिलांच्या सर्व डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रमुख लता अरगडे म्हणाल्या की, गेल्यावर्षी रेल्वे प्रशासनाने महिलांच्या सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची घोषणा केली होती. ते कंट्रोल रुमशी जोडले जाणार होते. त्याची अंमलबजावणी अत्यंत कूर्मगतीने सुरू आहे. महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही असता तर ही घटना नक्कीच टाळता आली असती, असे त्या म्हणाल्या.

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलांच्या २०० डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवले आहेत. ६०० महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम पुढील वर्षी पूर्ण होईल. प. रेल्वेने २०३ डब्यात सीसीटीव्ही बसवले आहेत. त्यात १४४ महिलांच्या तर ५९ सर्वसाधारण डब्यात सीसीटीव्ही बसवले आहेत. आणखीन २११ डब्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in