दोन हजार गणेशोत्सव मंडळांना परवानगी; शेवटच्या दिवसापर्यंत आले ३२५५ अर्ज

३१ ऑगस्ट रोजी बाप्पाचे आगमन होणार असून सार्वजनिक मंडळात बाप्पाचे आगमन झाले आहे.
दोन हजार गणेशोत्सव मंडळांना परवानगी; शेवटच्या दिवसापर्यंत आले ३२५५ अर्ज

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात बाप्पाचे स्वागताची जय्यत तयारी सुरु असून गणेशोत्सवासाठी मंगळवार २३ ऑगस्टपर्यंत ३,२५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कागदपत्रांची पूर्तता केलेल्या १,९४७ मंडळांना परवानगी देण्यात आली असून उर्वरित २,७३२ मंडळाच्या अर्जावर प्रक्रिया सुरु असून ऑगस्ट अखेरपर्यंत कागदपत्रांची पूर्तता केल्यास परवानगी देण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त व गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी दिली.

३१ ऑगस्ट रोजी बाप्पाचे आगमन होणार असून सार्वजनिक मंडळात बाप्पाचे आगमन झाले आहे. मुंबईत रस्त्यालगत मंडप घालून साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवासाठी पालिकेची परवानगी घेणे अनिवार्य असते. या पार्श्वभूमीवर पालिकेने ४ जुलैपासून मंडळांना ऑनलाइन आणि ऑफलाइन परवानगीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in