हाजी अली येथे दोन हजार वाहन पार्किंग व्यवस्था; कोस्टल रोडवर हेलिपॅड; नाले सफाईत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

व्यसनाधीन पती आणि हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून एका महिलेने आपले मूल बेकायदेशीररित्या दत्तक दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
हाजी अली येथे दोन हजार वाहन पार्किंग व्यवस्था; कोस्टल रोडवर हेलिपॅड; नाले सफाईत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
एक्स @CMOMaharashtra
Published on

मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारण्याबाबत चाचणी करण्यात येणार आहे.

पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करा, हाजी अली येथे दोन हजार वाहन क्षमतेचे पार्किंग झोन तयार करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिका प्रशासनाला दिले. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या दोन लाख कोटींच्या प्रकल्पांची झाडाझडती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे विविध प्रकल्पांच्या सद्यःस्थितीची माहिती दिली.

पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनिःसारण प्रकल्प, आरोग्य विभागाचे १ लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये ७०० किमी किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरणाची कामे, वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारी मार्ग, गोरेगाव मुलुंड लिंक रोडसह गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल, सायन पूल, मढ-वर्सोवा पूल आदींचा समावेश आहे. तसेच वर्सोवा, मालाड, भांडुप, घाटकोपर येथील मलजल उदंचन केंद्र, वर्सोवा मलजल बोगदा, मिठी नदी पॅकेज मलजल बोगदा व प्राधान्य मलजल बोगदा या सात मलःनिसारण प्रकल्पांचाही समावेश आहे.

खड्डेमुक्त मुंबई

बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने ७०० किमी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील २ हजार कि.मी रस्ते सिमेंट काँक्रीटचे होतील. त्यामुळे सध्या सुरू असलेली कामे वेगाने पूर्ण करावीत. पावसाळ्यात या रस्ते कामांचा नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच कोस्टल रोड वर हेलिपॅड उभारण्याबाबत चाचणी करा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

logo
marathi.freepressjournal.in