कांदिवलीत दोन तरुणांची आत्महत्या

कांदिवली येथे दोन भिन्न घटनेत दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
कांदिवलीत दोन तरुणांची आत्महत्या

मुंबई : कांदिवली येथे दोन भिन्न घटनेत दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अजय अडवंत जहॉंगीड (२२) एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला तर प्रवीण आदिमान अचलखाम (२३) या तरुणाने इमारतीच्या सतराव्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपविले.

चारकोप, अस्टर पॅलेस इमारतीच्या ए/३०२ मध्ये अजय जहॉगीड हा त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत होता. तो एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्गात शिकत होता. त्याला परीक्षेत कमी गुण मिळत असल्याने तो मानसिक तणावात होता. शुक्रवारी सकाळी त्याने त्याच्या घरात ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबीयांना त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसरी घटना शुक्रवारी सकाळी कांदिवलीतील परिश्रम इमारतीत घडली. या इमारतीच्या सतराव्या मजल्यावर प्रवीण हा त्याच्या आई-वडील आणि मोठी बहिणीसोबत राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने शुक्रवारी सकाळी सतराव्या मजल्यावरून उडी मारली.

logo
marathi.freepressjournal.in