ट्रॉम्बे येथून घातक शस्त्रांसह दोन तरुणांना अटक

या माहितीनंतर या पथकाने त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून तेथून एक रिव्हॉल्व्हरसह दहा जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन जप्त केले होते.
ट्रॉम्बे येथून घातक शस्त्रांसह दोन तरुणांना अटक

मुंबई : ट्रॉम्बे येथून घातक शस्त्रांसह दोन तरुणांना आरसीएफ पोलिसांनी अटक केली. पप्पू बाबू मगरे आणि अल्लारखा इजिमियल शेख अशी या दोघांची नावे असून या दोघांकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, दहा जिवंत काडतुसे आणि एक मॅगझिन जप्त केले आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ट्रॉम्बे परिसरात दोन्ही आरोपी राहत असून त्यांच्याकडे घातक शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती

या माहितीनंतर या पथकाने त्यांच्या राहत्या घरी छापा टाकून तेथून एक रिव्हॉल्व्हरसह दहा जिवंत काडतुसे आणि एक मॅगझीन जप्त केले होते. याच गुन्ह्यांत नंतर पप्पू मगरे आणि अल्लारखा शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली. चौकशीत या शस्त्रांची ते दोघेही विक्री करणार होते.

मात्र त्यापूर्वीच या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांनी ते रिव्हॉल्व्हर कोठून आणले. या रिव्हॉल्व्हरचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला की होणार होता का, यापूर्वीही त्यांनी घातक शस्त्रांची विक्री केली आहे का याचा आत पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in