मुंबईत हिट अँड रन घटनेत दोन तरुणांचा मृत्यू

मुलुंड आणि लोअर परेल येथे दोन अपघातांच्या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहे.
मुंबईत हिट अँड रन घटनेत दोन तरुणांचा मृत्यू
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुलुंड आणि लोअर परेल येथे दोन अपघातांच्या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहे. मृत झालेल्या तरुणांची नावे प्रीतम थोरात व आयुष कैलास सिंह आहेत. जखमींची नावे प्रसाद पाटील, शिवम कमलेश सिंह आणि विशाल प्रेमबहादूर सिंह आहेत. याप्रकरणी नवघर आणि ना. म जोशी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघातांची नोंद करुन दोन्ही आरोपी कारचालकांना अटक केली आहे.

मुलुंडच्या हिट अँड रन घटनेत प्रितम थोरात या गणेशभक्ताच्या मृत्यूने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. मुलुंड येथील अपघात हा शनिवारी पहाटे चार वाजता मुलुंडच्या ९० फिट रोडवर, दान विजय सोसायटीसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रितम आणि प्रसाद हे दोघेही मुलुंडचे रहिवाशी असून मुलुंडचा राजा या नावाने प्रसिद्ध असलेल्या श्री गणेश मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ते कार्यकर्ते आहेत. शनिवारी पहाटे चार वाजता ते दोघेही गव्हाणपाडा, दान विजय सोसायटीसमोर स्क्रॅप होल्डिंग शिडीवरुन चढून जाहिरातीचा गेट लावत होते. याच दरम्यान तेथून भरवेगात जाणाऱ्या एका बीएमडब्ल्यू कारने त्यांना धडक दिली़ या अपघातात ते दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांच्या मित्रांनी कारचालकाचा पाठलाग केला, मात्र तो सुसाट वेगाने कार घेऊन पळून गेला. त्यानंतर या मित्रांनी जखमी झालेल्या प्रसाद आणि प्रितमला तातडीने वीर सावरकर रुग्णालयात दाखल केले. तिथे प्रितमला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर प्रसादवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in