ठाकरेंना मागच्या रांगेत बसवल्यावरून खडाखडी

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत व आदित्य ठाकरे हे दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत अगदी मागच्या रांगेत बसल्याचे दिसून आले होते. यावरून सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
ठाकरेंना मागच्या रांगेत बसवल्यावरून खडाखडी
Published on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत व आदित्य ठाकरे हे दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत अगदी मागच्या रांगेत बसल्याचे दिसून आले होते. यावरून सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, “आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले होते. त्यामुळे तिथे त्यांचा काय मान-सन्मान आहे, तो आपल्या लक्षात आलेला आहे. भाषणात खूप म्हणायचं, दिल्लीसमोर मान झुकणार नाही. दिल्लीसमोर आम्ही पायघड्या टाकणार नाही आणि आता दिल्लीत काय परिस्थिती आहे? ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे, हे बघितल्यानंतर थोडं दु:ख होतं, पण ठिक आहे.”

दुसरीकडे शिंदे गटानेही ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ‘थोडा जरी स्वाभिमान, आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उठा’, अशी टीका शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. काँग्रेससोबत जाऊन उद्धव ठाकरे स्वतःचीच अवहेलना करून घेत असल्यामुळे त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांची माफी मागावी, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे.

घरगुती कार्यक्रमात कुणी कुठे बसायचे हे आम्ही ठरवू - आदित्य ठाकरे

भाजप व शिंदे गटाच्या टीकेवर आदित्य ठाकरे म्हणाले की, तो घरगुती कार्यक्रम होता आणि घरात कोणी कुठे बसायचे हे आम्ही ठरवू. तसेच स्क्रीनपासून लांब बसणेच योग्य म्हणून आम्ही मागे बसलो होतो.

logo
marathi.freepressjournal.in