चला, कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे शाखाप्रमुखांना निर्देश

मुंबईतील २२७ प्रभागांमधील मतदारांच्या समस्या जाणून घ्या, मतदार यादीतील ३०० घरांशी संपर्क साधा, आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवायचा आहे, यासाठी चला कामाला लागा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुखांना दिले आहेत. तसेच मुंबई मराठी माणसाची आहे, अशी भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना घातली आहे.
Uddhav Thackeray
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईतील २२७ प्रभागांमधील मतदारांच्या समस्या जाणून घ्या, मतदार यादीतील ३०० घरांशी संपर्क साधा, आगामी निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवायचा आहे, यासाठी चला कामाला लागा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुखांना दिले आहेत. तसेच मुंबई मराठी माणसाची आहे, अशी भावनिक साद उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना घातली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उभारी घेण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सज्ज झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने काहीसे तारले. मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने सपशेल नाकारले. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मविआतही मतभेद असल्याचे समोर आले होते. विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या असा सूर आळवला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तशी चाचपणी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई पालिकेवर देशाचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in