उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना धारावीचा पुनर्विकास केला नाही ;पुनर्विकास समितीच्या रमाकांत गुप्ता यांचा आरोप

धारावी पुनर्विकासाला विरोध करणारे फक्त वैयक्तिक श्रेयासाठी धारावीच्या विकासाला विरोध करत आहेत, त्यांना धारावीकरांच्या विकासाशी काही घेणे देणे नाही.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना धारावीचा पुनर्विकास केला नाही ;पुनर्विकास समितीच्या रमाकांत गुप्ता यांचा आरोप

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी ते स्वतः मुख्यमंत्री असताना धारावीकरांना ५०० स्क्वे. फुटांचे घर का नाही दिले. मातोश्री १ नंतर मोतोश्री २ देखील उभे राहिले, धारावीचा विकास जे बाळासाहेबांचे स्वप्न होते, तो त्यांनी केला नाही किंवा त्या दृष्टीने पाऊले उचलली नाहीत, असे वक्तव्य धारावी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष रमाकांत गुप्ता यांनी केले. धारावी पुनर्विकास समितीतर्फे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळेस त्यांच्या सोबत धारावी पुनर्विकास समितीचे कोषाध्यक्ष आणि चर्मकार नेते मनोहर रायबागे, सरचिटणीस राजीव चौबे, उद्योगपती भास्कर शेट्टी, व्यावसायिक वकील शेख आणि प्रवीण जैन उपस्थित होते.

"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे स्वप्न होते की, धारावी झोपडपट्टीचे नंदनवन व्हावे, धारावीकरांचा विकास व्हावा त्यासाठी त्यावेळच्या मुख्यमंत्री मनोहर जोशींना एक योजना तयार करण्यास सांगितली आणि एसआरए योजनेचा जन्म झाला. पण संपूर्ण मुंबईचा एसआरए योजनेअंतर्गत विकास होत असताना धारावीला आजपर्यंत या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार धारावीकरांना ४०० स्क्वे. फुटांचे घर देऊन धारावीचा विकास करण्यास तयार आहेत, तर हेच लोक ५०० स्क्वे. फुटांची मागणी करून सरकारचा व धारावी पुनर्विकासाचा विरोध करत आहेत. ५०० स्क्वे. फुटांच्या मागणीसाठी धारावीच्या पुनर्विकासाला विरोध करणारे उद्धव ठाकरे यांनी ते स्वतः मुख्यमंत्री असताना धारावीकरांना ५०० स्क्वे. फुटांचे घर का नाही दिले. मातोश्री १ नंतर मोतोश्री २ देखील उभे राहिले, धारावीचा विकास जे बाळासाहेबांचे स्वप्न होते, तो त्यांनी केला नाही किंवा त्या दृष्टीने पाऊले उचलली नाहीत, असे वक्तव्य धारावी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष रमाकांत गुप्ता यांनी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले.

धारावीच्या विकासाला विरोध करणाऱ्यांचा मोर्चा -मनोहर रायबागे

धारावी पुनर्विकासाला विरोध करणारे फक्त वैयक्तिक श्रेयासाठी धारावीच्या विकासाला विरोध करत आहेत, त्यांना धारावीकरांच्या विकासाशी काही घेणे देणे नाही. याचे श्रेय या विद्यमान सरकारला मिळू नये म्हणून उद्या हे धारावी पुनर्विकासाच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. धारावी पुनर्विकासाच्या विरोधात काढला जाणारा उद्याचा मोर्चा धारावीकर नागरिकांचा नाही, तर धारावीच्या विकासाला विरोध करणाऱ्यांचा मोर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in