उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

पत्राचाळ प्रकरणात ‘ईडी’ने संजय राऊत यांची चौकशी सुरू केली होती. त्‍यांना चौकशीसाठी तीन वेळा हजर राहण्यास समन्सही बजावण्यात आले होते; मात्र
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
Published on

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री उशिरा ईडीने ताब्यामध्ये घेतलं. आज सकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्याना कोर्टामध्ये हजर करण्यात आले. या दरम्यान शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राऊत यांच्या भांडुप येथील घरी ठाकरे दाखल झाले.

संकटाच्या वेळी मी तुमच्यासोबत आहे. असे आश्वासन त्यांनी राऊत यांच्या आईला दिले. सकाळपासून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संजय राऊत यांच्या आई व इतर कुटुंबीय भावूक झाल्याचे दिसत आहे.

पत्राचाळ प्रकरणात ‘ईडी’ने संजय राऊत यांची चौकशी सुरू केली होती. त्‍यांना चौकशीसाठी तीन वेळा हजर राहण्यास समन्सही बजावण्यात आले होते; मात्र राऊत यांनी चौकशीत सहकार्य न केल्‍याचा ‘ईडी’ने आरोप ठेवला. अर्थातच, राऊत यांच्या वकिलांकडून असहकार्याचा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे. रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्‍थानी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांचे एक पथक पोहोचले. संजय राऊत यांच्यासोबत त्‍यांचे बंधू आमदार सुनील राऊत देखील होते.

logo
marathi.freepressjournal.in