'फेक अकाऊंटवरून पोस्ट, मग १५-२० दिवस काय...'; अमित शहांच्या भेटीवर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत केली टीका
'फेक अकाऊंटवरून पोस्ट, मग १५-२० दिवस काय...'; अमित शहांच्या भेटीवर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Published on

महाराष्ट्र आणि कर्नाटकचे दोन्हीही मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. यामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अनेक निर्णय घेतले आहेत. यावर आता महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "कालच्या बैठकीत नवीन काय झालं? सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. न्यायालयामध्ये प्रकरण असताना कोणी काही करु नये. तरीही बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला गेला. फक्त महाराष्ट्रानेच हे सर्व नियम का पाळायचे? मुळातच या बैठकीचा अर्थ काय होता? कर्नाटककडून नेहमीच प्रश्न चिघळवला गेला आहे."

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावाने महाराष्ट्रसंबंधी वादग्रस्त ट्वीट करण्यात आले होते. अमित शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र, यावर ते ट्विटरचे अकाउंट आपलं नव्हत, अशी माहिती मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिली. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, "गेली १५ ते २० दिवस हा सीमावादाचा प्रश चिघळत चालला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे ट्विटर हॅक झाले का? कसे झाले? तो शुद्ध होईलच. पण, इतकेदिवस तुम्ही का गप्प बसला होतात? याबाबतीत खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता? हे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखेच झाले. त्यात आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होयबा करून आले." अशी बोचरी टीका त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in