मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यादिवशी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप केले. यानंतर आज उद्धव ठाकरे हे त्यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना म्हणाले की, "जशी स्क्रिप्ट आली, तशी त्यांनी वाचली" असा टोला लगावला. दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपणावर मी माझी भूमिका मांडले असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "गेल्या १८ वर्षांपासून तेच ते घासलेले, पुसले भाषण होते. मी माझी भूमिका मांडलेली आहे. इतकी वर्ष कारवाई होत नव्हती आणि आता कारवाई होते. जशी स्क्रिप्ट आली तशी त्यांनी ती वाचून दाखवली. राज्यात इतरही अनेक अनधिकृत गोष्टी आहेत, त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी पत्र द्यावे" असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवरही स्पष्टीकरण दिले. ते या भेटीबद्दल म्हणाले की, "याआधी खुलेपणा होता. पण हल्ली असे दिसत आहे की, बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी ठरतात. भविष्यात कधी अशी बंद दाराआड चर्चेचा विषय आला तर तेव्हाच तेव्हा बघू. ही भेट फक्त हाय आणि हॅलो वाली होती. " असेही ते म्हणाले.