महाराष्ट्राच्या मनात असेल तेच होईल; सेना-मनसेच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका

राज-उद्धव एकत्र येणार या चर्चेवर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मनसे-सेना युतीबाबत आता थेट बातमीच देईन, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, असेही ते म्हणाले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राज-उद्धव एकत्र येणार या चर्चेवर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मनसे-सेना युतीबाबत आता थेट बातमीच देईन, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत सुजाता शिंगाडे यांची ठाकरे सेनेत घर वापसी झाली आहे. सुजाता शिंगाडे यांनी शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

माझ्या शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे कोणते नेते आमच्या एकमेकांच्या संपर्कात आहेत, त्यांच्याही मनात संभ्रम नाही. त्यामुळे आम्ही कोणताही संदेश देण्यापेक्षा आम्हाला जी काही बातमी द्यायची आहे, ती आम्ही देऊ, असे ठाकरेंनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in