उद्धव ठाकरेंनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा; संदीप देशपांडे यांची टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी मनसेवर टीकास्त्र सोडले आहे. त्या टीकेला उत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वरील आव्हान उद्धव ठाकरे यांना केले.
उद्धव ठाकरेंनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा; संदीप देशपांडे यांची टीका

प्रतिनिधी/मुंबई

तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची लालसा होती, म्हणून तुम्ही वेगळी भुमिका घेतली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनविणार असल्याचे सांगत, तेही पद तुम्ही स्वत:च्या पारड्यात पाडून घेतले, अशा लोकांनी आम्हाला शिकवू नये. जर तुम्हाला खरंच स्वाभिमान असेल तर तुम्हाला जे आमदार सोडून गेले आहेत, त्यांच्या जीवावर तुम्ही आमदार झालात, त्या आमदारकीचा राजीनामा द्या, असे आव्हान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिले. संजय राऊत यांनीदेखील खासदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवावी, असा टोलाही त्यांनी यावेळी लगाविला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी मनसेवर टीकास्त्र सोडले आहे. त्या टीकेला उत्तर देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वरील आव्हान उद्धव ठाकरे यांना केले.

यावेळी संदीप देशपांडे म्हणाले की, “जागावाटपात कोणत्याही प्रकारची वाटाघाटी न करता पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. यासाठी हिंमत लागते. महाराष्ट्राचा विचार करणारा माणूसच हे करू शकतो, देशाचा विचार करणारा माणूसच ही भूमिका मांडू शकतो. तेवढी उंची उद्धव ठाकरे यांची नाही आणि संजय राऊत यांचीसुद्धा नाही. ज्यांनी आयुष्यभर फक्त मलिदा खाण्याचे काम केले, त्यांनी आम्हांला शिकवू नये,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगाविला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in