उमेश कोल्हे हत्याप्रकरणी यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल

शहर कोतवाली पोलिसांनी सोमवारी या हत्याकांडातील सर्व आरोपींविरोधात ‘युएपीए’ अंतर्गत कलमे जोडली.
उमेश कोल्हे हत्याप्रकरणी यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल
Published on

येथील व्यावसायिक उमेश कोल्हे हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींविरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यान्वये (यूएपीए) देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहर कोतवाली पोलिसांनी सोमवारी या हत्याकांडातील सर्व आरोपींविरोधात ‘युएपीए’ अंतर्गत कलमे जोडली. त्यात कलम १६, १८ आणि २० चा समावेश आहे. लोकांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याने हत्येच्या गुन्ह्यासोबतच ‘यूएपीए’ अंतर्गत ही कलमे जोडण्यात आली आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए)सोपविण्याची प्रक्रिया सुरू आहे. सात आरोपींपैकी अतीब रशीद याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चार आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. ‘एनआयए’ त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्याची शक्यता आहे. सहावा आरोपी डॉ. युसूफ खान हा पोलीस कोठडीत असून या प्रकरणातील सूत्रधार आरोपी इरफान खान याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in