राणा दाम्पत्याच्या खार येथील घरात नियमबाह्य पद्धतीने बांधकाम

राणा दाम्पत्याच्या खार येथील घरात नियमबाह्य पद्धतीने बांधकाम

महिनाभरापासून चर्चेत आलेल्या राणा दाम्पत्याच्या खार येथील घरात नियमबाह्य बांधकाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेच्या एच पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी राणा दाम्पत्याच्या घरी जाऊन पाहणी केली असता नियमबाह्य बांधकाम झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला पुन्हा नोटीस बजावणार असल्याचे एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांनी सांगितले.

खार पश्चिम, १४ व्या रस्त्यावर ‘लाव्ही’ या इमारतीत राणा दाम्पत्याचे आठव्या मजल्यावरील ४१२ क्रमांकाचे घर आहे. या घरात आराखड्याव्यतिरिक्त नियमबाह्य बांधकाम झाल्याचा ठपका ठेवत मुंबई महापालिकेने ४८८ अन्वये नोटीस बजावली होती; परंतु राणा दाम्पत्य कारागृहात असल्याने घर बंद होते. त्यामुळे पालिकेच्या पथकाला दोन वेळा पाहणी न करताच माघारी परतावे लागले होते. आता जामिनावर सुटलेले खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा खार येथील घरी आल्याची माहिती मिळताच पालिकेच्या एच पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी जाऊन पाहणी केली. यात घरात नियमबाह्य बांधकाम झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याना पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे विसपुते यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.