युनियन बँकच्या तिमही नफ्यात कोटींची वाढ; बुडित कर्जात घट झाल्याने व्याजदर वाढले

एप्रिल ते जून या कालावधीत २०,९९१.०९ कोटी रुपये इतके वाढले असून २०२१-२२ मध्ये वरील कालावधीत ते १९,९१३.६४ कोटी रुपये झाले
युनियन बँकच्या तिमही नफ्यात कोटींची वाढ; बुडित कर्जात घट झाल्याने व्याजदर वाढले
Published on

युनियन बँक ऑफ इंडियाने मंगळवारी वित्तीय निकाल जाहीर केला. बँकेला जून २०२२मध्ये संपलेल्या तिमाहीत ३२ टक्के निव्वळ नफा - १५५८.४६ कोटी रुपये झाला आहे. बुडित कर्जात घट झाल्याने आणि व्याजदरात वाढ झाल्याने व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नातही मोठी वाढ झाल्याने निव्वळ नफा वाढण्यास मदत झाली. बँकेला मागील वर्षी जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत १,१८०.९८ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.

बँकेचे एकूण उत्पन्न एप्रिल ते जून या कालावधीत २०,९९१.०९ कोटी रुपये इतके वाढले असून २०२१-२२ मध्ये वरील कालावधीत ते १९,९१३.६४ कोटी रुपये झाले होते, असे युनियन बँक ऑफ इंडियाने शेअर बाजाराला सादर केलेल्या माहितीत म्हटले आहे. तसेच तिमाहीत व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्ना ६.१ टक्के वाढ होऊन १८,१७४.२४ कोटी रुपये झाले असून पहिल्या तिमाहीत ते १४,७३२.२९ कोटी रुपये झाले होते. बँकेच्या बुडित कर्जात (एनपीए) जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत घट होऊन १०.२२ टक्के झाले. मागील वर्षी वरील तिमाहीत हे प्रमाण १३.६० टक्के होते. मूल्यात सांगायचे झाल्यास पहिल्या तिमाहीतील एनपीए ७४,५०० कोटींवरुन जूनमधील तिमाहीत ८७,७६२.१९ कोटी रुपये झाला. तर निव्वळ एनपीएमध्येही तिमाहीत ३.३१ टक्के (२२,३९१.९५ कोटी) इतका कमी झाला असून आधीतो ४.६९ टक्के (२७,४३७.४५ कोटी रुपये होता.

logo
marathi.freepressjournal.in