केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन आज गोव्यात येणार

केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन आज गोव्यात येणार

पणजी येथे 'धरोहर' हे राष्ट्रीय सीमाशुल्क आणि जीएसटी संग्रहालय देशाला समर्पित करणार

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आझादी का अमृतमहोत्सव आयकॉनिक सप्ताह महोत्सवाचा एक भाग म्हणून केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन शनिवारी गोव्यात पणजी येथे 'धरोहर' हे राष्ट्रीय सीमाशुल्क आणि जीएसटी संग्रहालय देशाला समर्पित करणार आहेत.

मांडवी नदीच्या काठी पणजीच्या प्रसिद्ध ब्लू बिल्डिंगमध्ये हे धरोहर संग्रहालय आहे. गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत पूर्वी अल्फांडेगा या नावाने ओळखली जाणारी ही दुमजली इमारत ४००वर्षांहून अधिक काळ या ठिकाणी उभी आहे. धरोहर हे देशातील अशा प्रकारचे एकमेव संग्रहालय आहे. भारतीय सीमाशुल्क विभागाद्वारे देशभरातून जप्त केलेल्या कलाकृती या संग्रहालयात आहेत.

आईने- ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍अकबरीची हस्तलिखिते, अमीन खांबांची प्रतिकृती, जप्‍त केलेल्या धातूच्या आणि दगडी कलाकृती, हस्तिदंती व वन्यजीव वस्तू ही या प्रदर्शनातील प्रमुख लक्षणीय आकर्षणे आहेत. सीमाशुल्क प्रक्रिया नेमकी काय आहे याची माहिती सामान्य लोकांना व्हाही यासाठी येथे सोय केलेली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in