मुंबईतील फेरीवाल्यांच्या भेटीला केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी ;पीएम स्वनिधी योजनेचा घेणार आढावा

या सभेत केंद्रीय कॅबिनेट मंत्री हरदीपसिंग पुरी हे स्वत: उपस्थित राहणार असून ते मुंबईतील फेरीवाल्यांच्या व्यथा ऐकणार आहेत.
मुंबईतील फेरीवाल्यांच्या भेटीला केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी ;पीएम स्वनिधी योजनेचा घेणार आढावा

मुंबई : नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया आणि आझाद हॉकर्स युनियन या संस्थांनी मुंबईत वांद्रे येथे एका मल्टी स्टेकहोल्डर सभेचे आयोजन गुरुवारी केले असल्याची माहिती आजाद हॉकर्स युनियनचे संस्थापक दयाशंकर सिंग यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.

या सभेत केंद्रीय कॅबिनेट मंत्री हरदीपसिंग पुरी हे स्वत: उपस्थित राहणार असून ते मुंबईतील फेरीवाल्यांच्या व्यथा ऐकणार आहेत. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त मनोज रानडे, ठाणे महानगरपालिका उपायुक्त वर्षा दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडियाचे राज्य संयोजक गुरुनाथ सावंत यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेची यशस्वी अंमलबजावणी, त्यामध्ये येणाऱ्या समस्या, स्वनिधी ते समृद्धी योजनेची अंमलबजावणी, मुंबईतील फेरीवाल्यांच्या समस्या, टाऊन वेन्डिंग कमिटीच्या निवडणुकीस होणारा विलंब, फेरीवाला धोरण आणि कायद्याची अंमलबजावणी, तक्रार निवारण समितीची स्थापना आदी मुंबईतील प्रमुख विषय आणि त्या धर्तीवर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट आणि त्यांचे त्यावरील विचार याबाबत आजच्या होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल, असे महासचिव यू. रामास्वामी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in