भटक्‍या श्‍वानांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन टॅग खाद्य काय द्यावे, लसीकरण, निर्बिजीकरणासह वैद्यकीय माहिती

रेबीज मुक्त मुंबईसाठी रेबिज लसीकरण मोहीमेला सुरुवात
भटक्‍या श्‍वानांसाठी युनिक आयडेंटिफिकेशन टॅग खाद्य काय द्यावे, लसीकरण, निर्बिजीकरणासह वैद्यकीय माहिती
Published on

मुंबई : भटक्या कुत्र्यांना खाद्य काय द्यावे, लसीकरण निर्बिजीकरणासह वैद्यकीय माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी क्यू आर कोड स्कॅन करताच हा सगळा डेटा उपलब्ध होणार आहे. तसेच रेबीज मुक्त मुंबईसाठी रेबीजचा डोस देण्यात येत असून, महापालिका आणि योडा व कॅप्‍टन इंडिया झिमॅक्‍स या स्‍वयंसेवी संस्‍थांच्‍या वतीने मुंबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर २६ भटक्‍या श्‍वानांचे रेबिज लसीकरण करण्‍यात आले. दरम्यान, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच मत्स्यपालन आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०३०पर्यंत कुत्र्यांपासून होणाऱ्या रेबिज रोगाच्या निर्मुलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे.

सन २०१४ मधील सर्वेक्षणानुसार, मुंबईमध्ये सुमारे ९५ हजार भटके श्‍वान होते. ती संख्या आता सुमारे १ लाख ६४ हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. या भटक्या श्‍वानांना रेबिज या रोगाची लागण होऊ नये तसेच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबिज प्रतिबंधक लस देणे गरजेचे असते. बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने भटक्या श्‍वानांच्‍या लसीकरणाचा उपक्रम आधीपासूनच सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in