पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्याला अनोखी शिक्षा; सामुदायिक सेवा करण्याचे आदेश

कर्तव्यावर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला करणार्याप एका वाहन चालकाला वली.न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने पोलिसावर हल्ला केल्याबद्दल संपूर्ण पोलीस दलाची माफी मागितल्यानंतर आरोपीविरोधातील फौजदारी गुन्हा रद्द केला.
पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्याला अनोखी शिक्षा; सामुदायिक सेवा करण्याचे आदेश
Published on

मुंबई : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला करणार्याप एका वाहन चालकाला वली.न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने पोलिसावर हल्ला केल्याबद्दल संपूर्ण पोलीस दलाची माफी मागितल्यानंतर आरोपीविरोधातील फौजदारी गुन्हा रद्द केला. मात्र याचवेळी त्याला चार रविवारी सामुदायिक सेवा करण्याचे आदेश देताना त्याच्या आईला प्राण्यांच्या संरक्षण मोहिमेत २५ हजार रुपये दान देण्याचे निदेर्ष दिले.

सात वर्षापूर्वी हुशद नेविले बाचा हा (१७ वर्षे) परवाना व हेल्मेटशिवाय मोटारसायकल चालवत होता.मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी त्याला रोखले असता त्याने पोलिसांशी हुज्जत घातली आणि एका कॉन्स्टेबलवर हल्ला केला ओशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली होती. याचदरम्यान बाचाच्या आईने देखील गोंधळ घातला होता. त्यात एका हवालदाराच्या गणवेशाचे नुकसान करण्यात आले होते. याप्रकरणी दोघांवर आयपीसी व मोटार वाहन कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्याची विनंती करीत दोघांनी ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यां च्यावतीने अॅनड. वारुंजीकर यांनी आरोपी आणि त्याच्या आईचे कृत्य चुकीचे बसल्याचे मान्य केले. मात्र आरोपी तरुण असून गुन्हा दाखल असल्याने त्याच्या करिअरमध्ये अडथळा येत आहे. त्यामुळे तरुणा विरोधातील गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी विनंती खंडपीठाला केली. तसेच दोघांनीही संपूर्ण पोलीस दलाची माफी मागितली. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची दखल घेत न्यायालयाने गुन्हा रद्द करत दिलासा दिला. मात्र हा दिलासा देताना. खंडपीठज्ञने तरुणाला २६ जानेवारीपासून पुढील चार आठवडे सामुदायिक सेवा करण्याचे निर्देश दिले.

logo
marathi.freepressjournal.in