रेसकोर्सचा मोकळा भूखंड बळकावणाऱ्यांविरोधात एकत्र या! आदित्य ठाकरेंचे मुंबईकरांना खुले पत्र

महालक्ष्मी रेसकोर्सचा मोकळा भूखंड हा मुंबईकराचा हक्काचा आहे. परंतु २२६ एकर जमीन मित्र विकासकाला देण्याचा डाव मुख्यमंत्र्यांचा आहे.
रेसकोर्सचा मोकळा भूखंड बळकावणाऱ्यांविरोधात एकत्र या! आदित्य ठाकरेंचे मुंबईकरांना खुले पत्र
Published on

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सचा २२६ एकरचा मोकळा भूखंड मित्र विकासकाला देण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेला कोट्यवधी रुपयांचा भूखंड मुंबईकरांना विश्वासात न घेता, पालिका प्रशासनाला हाताशी धरून आपल्याच मित्र विकासकाला देण्याचा घाट मुख्यमंत्र्यांनी घातला आहे. मुंबईसाठी असलेला भूखंड बळकवणाऱ्या विरोधात मतभेद विसरून मुंबईकरांनी एकत्र येऊन लढा द्यावा, असे खुले पत्र युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लिहिले आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सचा मोकळा भूखंड हा मुंबईकराचा हक्काचा आहे. परंतु २२६ एकर जमीन मित्र विकासकाला देण्याचा डाव मुख्यमंत्र्यांचा आहे. याबाबत याआधीही वाचा फोडली असून घोटाळाही नुकताच उघड केल्याचे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर स्पष्ट केले. तसेच रेसकोर्सचा मोकळा भूखंड बळकवण्यासाठी ‘आरडब्ल्यूआयटीसी’ला धमकावण्यात येत आहे, हा प्रकार उघडकीस आणला आहे.

या प्रश्नांची उत्तरे द्या!

मुंबईत वाढलेल्या प्रदुषणाकडे दुर्लक्ष करून बिल्डरला वाढीव एफएसआय देणार की जागा देण्याचा हा डाव आहे का?

पालिका आणि ‘आरडब्ल्यूआयटीसी’ या ठिकाणी फॅन्सी क्लब हाऊस बांधणार का? हे का? आणि केल्यास हा प्रकल्प कोण ऑपरेट करणार?

मुंबईकरांच्या हक्काची जागा

बिल्डर-काँट्रॅक्टरच्या घशात घालण्याचा निर्णय चार जण कसे घेऊ शकतात?

logo
marathi.freepressjournal.in