सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अनैसगिक लैगिंक अत्याचार

स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली
सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अनैसगिक लैगिंक अत्याचार

मुंबई : सहा वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित १६ वर्षांच्या मुलाने अनैसगिक लैगिंक अत्याचार केल्याची घटना खार परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याला बालसुधागृहात पाठविण्यात आले आहे.

रविवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. सहा वर्षांची पिडीत मुलगी आणि आरोपी मुलगा एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. रविवारी सायंकाळी ही मुलगी खेळत असताना आरोपीने तिला चॉकलेट देण्याचा बहाणा करून त्याच्या घरी आणले. त्यानंतर त्याने तिच्यावर अनैसर्गिक लैगिंक अत्याचार केले होते. घरी रडत आलेल्या या मुलीने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी खार पोलिसांत आरोपी मुलाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भादवीसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आरोपी मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. पिडीत मुलीसह आरोपीची लवकरच पोलिसांकडून मेडिकल चाचणी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in