अवयवदान चालना मिळणार वाडिया हॉस्पिटलव्दारे ‘द वॉल ऑफ ऑनर’चे अनावरण

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण विभाग सुसज्ज आहे
अवयवदान चालना मिळणार वाडिया हॉस्पिटलव्दारे ‘द वॉल ऑफ ऑनर’चे अनावरण

मुंबई : दीर्घकालीन आजार किंवा आरोग्यविषयी गुंतागुंतीच्या समस्यांनी ग्रासलेल्यां रुग्णांना अवयवदानाच्या माध्यमातून नवे आयुष्य मिळते. अवयव दानाच्या निर्णयाने एक व्यक्ती ८ जणांना नवे आयुष्य मिळवून देऊ शकतो. राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त, बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनने 'द वॉल ऑफ ऑनर' चे अनावरण करण्यात आले.

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण विभाग सुसज्ज आहे आणि त्याच्या कौशल्याने अत्यंत कमी कालावधीत ६ यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आहेत. तसेच अवयव प्रत्यारोपणाची नोंदणी गरजू रुग्णांसाठी सुरू असून, ज्या मुलांना अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. लोकांना हे उदात्त कार्य स्वीकारण्यासाठी प्रेरित करणे हा यामागचा उद्देश आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर तसेच उपस्थित पाहुण्यांनी याठिकाणी अवयवदान करण्याचे आणि जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे मोलाचे वचन घेतल्याची माहिती वाडिया रूग्णालयाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली.

याठिकाणी प्रत्येकाला अवयवदानाचे महत्त्व समजावे यासाठी अनेक आकर्षक आणि माहितीपूर्ण सत्रांसह एक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, चर्चा सत्र, व्हिडिओ सादरीकरण आणि प्रत्यारोपण प्राप्तकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांकडून प्रशस्तिपत्रे तसेच अवयवदान कसे जीवनरक्षक आहे यावर माहिती देण्यात आली. अवयवदान मोहिमेला चालना देण्यासाठी 'द वॉल ऑफ ऑनर' चे अनावरण करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in