ठाणे, कल्याणमधील ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती ;सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा निर्णय

कल्याण शीळ मार्ग तसेच निळजे-पलावा हा मार्ग सध्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत
ठाणे, कल्याणमधील ग्रामीण रस्त्यांची  दर्जोन्नती
;सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र  चव्हाण यांचा निर्णय

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण तालुक्यातील कल्याण शिळा निळजे (पलावा) ते नारिवली-बाळे-वाकळण-दहिसर हे मार्ग इतर जिल्हा मार्ग तसेच ग्रामीण मार्ग, प्रमुख मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला आहे. या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यात आल्याने या परिसरातील रहिवाशांना दर्जेदार आणि सुस्थितीतील रस्ते उपलब्ध होणार आहेत.

कल्याण शीळ मार्ग तसेच निळजे-पलावा हा मार्ग सध्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहेत. परंतु, पुरेशा निधीअभावी तसेच काही कायदेशीर तंट्यांमुळे रस्त्याच्या बहुतांश भागांची देखभाल योग्य पद्धतीने होऊ शकत नव्हती. त्याचा फटका या परिसरातील वाहनचालक आणि नागरिकांना बसत होता. लोढा परिसरातील कासा रिओ आणि कासा रिओ टाऊनशिप या परिसरात राहणाऱ्या हजारो रहिवाशांना या खराब रस्त्यांचा नाहक त्रास सोसावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कल्याण आणि ठाणे तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्याचप्रमाणे या परिसरातील नागरिकांना रस्त्याच्या चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने रवींद्र चव्हाण यांनी रस्ते विशेष दुरुस्ती अंतर्गत १८.५ कोटीची तरतूद करण्याचे नियोजन केले आहे. या रस्त्याचे काम आता लवकरच सुरू होणार असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in