विद्यार्थ्यांसाठी 'उत्थान' शिक्षणविषयक उपक्रम अदाणी कर्मचाऱ्यांचा सीएसआर प्रकल्पांसाठी सहभाग

अदाणी इलेक्ट्रिसिटीचे नेतृत्व कार्यसंघ हे उत्थान आणि स्वाभिमान या कंपनी सामाजिक दायित्व प्रकल्पाच्या लाभार्थ्यांसह सक्रियपणे सामुदायिक सहभागामध्ये सहभागी होतात.
विद्यार्थ्यांसाठी 'उत्थान' शिक्षणविषयक उपक्रम
अदाणी कर्मचाऱ्यांचा सीएसआर प्रकल्पांसाठी सहभाग
PM

मुंबई : समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने अदाणी फाऊंडेशनने मुंबईत नुकत्याच राबिविलेल्या कंपनी सामाजिक दायित्व (सीएसआर) उपक्रमात अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने सहभाग घेतला. अदाणी फाऊंडेशन हे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या सहकार्याने वंचित समुदायांसाठी दोन महत्त्वपूर्ण प्रकल्प चालवते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘उत्थान’ हा शिक्षणविषयक कार्यक्रम आणि मुंबईतील कमी विशेषाधिकार असलेल्या भागात महिलांसाठी शाश्वत उपजीविका विकासाला चालना देण्यासाठीचा ‘स्वाभिमान’ कौशल्य उपक्रम घेतला जातो.

अदाणी इलेक्ट्रिसिटीचे नेतृत्व कार्यसंघ हे उत्थान आणि स्वाभिमान या कंपनी सामाजिक दायित्व प्रकल्पाच्या लाभार्थ्यांसह सक्रियपणे सामुदायिक सहभागामध्ये सहभागी होतात. या सीएसआर प्रकल्पाद्वारे स्वयंसेवा केल्यामुळे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांच्या गरजा आणि आव्हानांबाबतचा उत्कृष्ट दृष्टीकोन समाजाला मिळतो. विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि त्यातील सातत्य राखून ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘मदर्स मीट’मध्ये स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग घेतला. ‘रिडिंग क्लब्स’ने पायाभूत साक्षरता आणि संख्यात्मकता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले. तसेच महापालिका शाळांमध्ये उत्थान उपक्रमामुळे प्रभावित अशा लाभार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधण्यात आला. त्याचप्रमाणे, स्वाभिमान कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून स्वयंसेवकांनी बाजारपेठेतील प्रवेश सक्षम करणारे आणि संसाधने उपलब्ध करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. यामुळे महिलांना दागिने बनवणे, मसाला तयार करणे आणि घराची सजावट करणे यासह अनेक कलाकुसर या कुशलतेद्वारे शाश्वत उपजीविका वृद्धिंगत करणे करणे शक्य होत आहे.   

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबईचे प्रवक्ते म्हणाले, “सीएसआर प्रकल्पांमध्ये स्वेच्छेने सहभागी होणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे. अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या नेतृत्व कार्यसंघाकडे केवळ व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्याचीच नव्हे तर समाजावर आणि पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव टाकण्याची जबाबदारी आहे. आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांच्या गरजा आणि आव्हाने समजून घेण्यासाठी नेतृत्व संघांसाठी हे सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ आहे.

logo
marathi.freepressjournal.in