स्टाप वर्क नोटीस मिळताच कंत्राटदार, विकासक वटणीवर ;वांद्र्यातील बांधकाम ठिकाणी तातडीने उपाययोजना

मुंबईत विविध प्राधिकरणाची सहा हजार बांधकामे सुरू आहेत; मात्र वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत
स्टाप वर्क नोटीस मिळताच कंत्राटदार, विकासक वटणीवर ;वांद्र्यातील बांधकाम ठिकाणी तातडीने उपाययोजना

मुंबई : प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बांधकाम ठिकाणी स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आल्या आहेत.‌ वांद्रे येथील ८ बांधकाम प्रकल्पांना स्टॉप वर्क नोटीस मिळताच पालिकेने आखून दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले आहे. त्यामुळे पालिकेच्या दणक्यानंतर कंत्राटदार विकासक वटणीवर आले आहेत.

मुंबईत विविध प्राधिकरणाची सहा हजार बांधकामे सुरू आहेत; मात्र वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. या बांधकामांना ऑनलाइन नोटीस बजावून धूळ प्रतिबंधक उपायोजना करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. यानंतर कार्यवाही केली नसल्याने ५५० बांधकामांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी यानंतरही कार्यवाही होत नसल्याने ७६३ प्रकल्पांना स्टॉप वर्क नोटीसही देण्यात आली असून, आता बांधकाम ‘सील’ करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे बेजबाबदार बांधकाम प्रकल्प वटणीवर आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in