Urfi Javed Controversy : 'चित्रा मेरी...' उर्फी जावेदने ट्विट करत चित्रा वाघ यांना डिवचले

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदविरोधात (Urfi Javed Controversy) पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आता उर्फी जावेदने त्यांना डिवचने चालू ठेवले
Urfi Javed Controversy : 'चित्रा मेरी...' उर्फी जावेदने ट्विट करत चित्रा वाघ यांना डिवचले

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. अशामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी तिच्या तोकड्या कपड्यांवरून कारवाई करण्यात यावी, अशी पोलिसांकडे मागणी केली होती. यामुळे राज्यातले राजकारण चांगलेच तापलेले आहे. तिच्यावर टीका करताना चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राहस्त्रवाडीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावरदेखील निशाणा साधला होता. दरम्यान, या वादामध्ये तेल ओतण्याचे काम आता खुद्द उर्फीने सुरु केल्याचे चित्र आहे. तिने २ ट्विट करत चित्रा वाघ यांना डिवचले आहे.

उर्फी जावेदने साडीतील एक फोटो शेअर करत 'अजून खूप सुधारणा बाकी आहेत. सॉरी चित्रा वाघजी. आय लव्ह यु' असे म्हणत त्यांना टॅग केले आहे.

तर, काही वेळाने दुसरे ट्विट करत 'मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू' म्हणत डिवचले आहे. यामुळे आता हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. यापूर्वीही तिने माध्यमांसमोर अप्रत्यक्षपणे टीका करणाऱ्यांना उत्तर देताना, 'माझा नंगानाच चालूच राहणार' असे म्हणत आव्हान दिले होते.

कमी कपडे का घालते? यावर उर्फीने एक व्हिडीओ जारी करत 'कपड्यांची अ‍ॅलर्जी होते म्हणून मी कमी कपडे घालते' असे म्हंटले होते. यावरूनही चित्रा वाघ उत्तर देत म्हणाल्या होत्या की, "पोलीस त्यांचे काम करतील, मात्र आम्ही आमचे काम करु. ऐकले नाहीतर सांगितले आहे काय करणार आहोत ते. काल कोणतरी म्हंटले की तिला कपड्यांची अ‍ॅलर्जी आहे. सगळ्या अ‍ॅलर्जीच्या गोळ्या आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.” असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in