तक्रारींसाठी ‘एमआय बेस्ट’ अॅप वापरा, बेस्ट उपक्रमाचे वीज ग्राहकांना आवाहन

पावसाळ्यात वीज ग्राहकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्या वतीने करण्यात आले
तक्रारींसाठी ‘एमआय बेस्ट’ अॅप वापरा, बेस्ट उपक्रमाचे वीज ग्राहकांना आवाहन

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होणे, शार्ट सर्किट, आगीच्या घटना घडल्यास ‘एमआय बेस्ट’ या अॅपवर तक्रार करा, असे आवाहन वीज ग्राहकांना बेस्ट उपक्रमाने केले आहे. वीजपुरवठा खंडित, शॉर्ट सर्किट अशा तक्रारी प्राप्त होताच निवारण करण्यात येईल. मात्र पावसाळयामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचणे, वाहतूक कोंडी यांमुळे खंडीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विलंब होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात वीज ग्राहकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबई शहरात बेस्ट उपक्रमाचे १० लाख ८० हजार वीज ग्राहक वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागातील अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस झटत असतात. पावसाळ्यात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तक्रारींचे निवारण करण्यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे आठवडयाच्या सर्व दिवशी रात्रंदिवस (२४ तास) वितळतार नियंत्रण कक्ष (फ्युज कंट्रोल) कार्यरत आहेत. नियंत्रण कक्षात तक्रार नोंदवताना वीज ग्राहकांनी त्यांचा वीजग्राहक क्रमांक अथवा वीज मापक क्रमांक नोंदवावा. वितळतार नियंत्रण कक्षाचे (फ्युज कंट्रोल) दूरध्वनी क्रमांक वीज देयकावर छापलेले आहेत. वीज ग्राहक त्यांच्या वीज पुरवठाबाबतच्या तक्रारी ‘एमआय बेस्ट’ या अॅपवर नोंदवू शकतात. सदरचे ॲप वीज ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी (मोबाईल ) क्रमांकावर गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in