लेटर हेड, बोधचिन्हाचा वापर केल्यास फौजदारी कारवाई होणार

७ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा २०१९ पासूनचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला
लेटर हेड, बोधचिन्हाचा वापर केल्यास फौजदारी कारवाई होणार

एकदा नगरसेवक माजी झाला म्हणजे त्याचे लोकप्रतिनिधींचे अधिकार संपुष्टात येतात. तरीही अनेक माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी असल्यासारखे वागतात; मात्र माजी नगरसेवकांनी लेटर हेड, बोधचिन्हाचा वापर केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाईची कायद्यात तरतूद आहे. त्यामुळे माजी नगरसेवकाने लेटर हेड, बोधचिन्हाचा वापर केल्यास कारवाई होऊ शकते, असे पालिकेच्या विधी विभागाने स्पष्ट केले आहे.

७ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा २०१९ पासूनचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला. तरीही अनेक माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी असल्यासारखे वागत असून, पालिकेचे लेटर हेड आणि बोधचिन्हाचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. नागरी समस्यांसंबंधी विभाग कार्यालयांना तसेच शाळा-कॉलेज प्रवेशासाठी अनेक माजी नगरसेवकांकडून लेखी पत्र दिली जातात. लेटर हेड आणि बोधचिन्हाचा हा गैरवापर असून असा वापर करणाऱ्यांवर पालिकेतर्फे कोणती कारवाई केली जाते, अशी विचारणा करणारे पत्र नागरिकायन संशोधन केंद्राचे समन्वयक आनंद भंडारे यांनी १९ जून २०२२ मध्ये पालिकेच्या निवडणूक विभागाकडे माहितीच्या अधिकाराखाली पाठवले होते. त्यावर पालिका कायद्यात कारवाईची तरतूद नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in