देहविक्रीच्या व्यवसायात अल्पवयीन मुलींचा वापर गुन्हे शाखेची कारवाई; महिलेसह दोघांना अटक

महिलेच्या चौकशीत हॉटेलचा मॅनेजरचा या कटात सहभाग उघडकीस आले. त्यानंतर दुर्गा सिंग आणि हॉटेल मॅनेजर मोहम्मद नावेद या दोघांना पोलिसांनी अटक केली
देहविक्रीच्या व्यवसायात अल्पवयीन मुलींचा वापर
गुन्हे शाखेची कारवाई; महिलेसह दोघांना अटक

मुंबई : अंधेरीतील एका हॉटेलमध्ये गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. देहविक्रीच्या व्यवसायात या महिलेने अल्पवयीन मुलीचा वापर केल्याचे उघडकीस आले असून तिच्या तावडीतून एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.

दुर्गा सिंग आणि मोहम्मद नावेद अशी या दोघांची नावे आहेत. यातील दुर्गा ही दलाल तर मोहम्मद हा हॉटेल मॅनेजर आहे. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी एमआयडीसी पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांनी सांगितले. अंधेरी येथील सिल्व्हर क्लाऊड हॉटेलमध्ये एक महिला ग्राहकांना अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायासाठी पुरवत असल्याची माहिती यूनिट १०च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी संबंधित महिलेस संपर्क साधून तिच्याकडे एका अल्पवयीन मुलीची मागणी केली होती. सौदा पक्का झाल्यानंतर ही महिला एका १२ वर्षांच्या मुलीसोबत हॉटेलमध्ये आली होती. यावेळी पोलिसांनी तिथे कारवाई करून या महिलेस अटक केली.

महिलेच्या चौकशीत हॉटेलचा मॅनेजरचा या कटात सहभाग उघडकीस आले. त्यानंतर दुर्गा सिंग आणि हॉटेल मॅनेजर मोहम्मद नावेद या दोघांना पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांच्या तावडीतून पोलिसांनी एका १२ वर्षांच्या मुलीची सुटका केली. कारवाईत पोलिसांनी ७ हजारांची कॅश आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. त्यांच्याविरुद्ध भादवीसह पिटा आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत नंतर दोन्ही आरोपींना अटक करून त्यांचा ताबा एमआयडीसी पोलिसांकडे सोपविण्यात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in