UTS New Rules : यूटीएसचे हे नवे नियम तुम्हाला माहितीय का?

रेल्वे स्टेशनवरींल (UTS) तिकीट खिडकीवर लांबच लांब रांग लावण्यापेक्षा लोक या ॲपद्वारे ऑनलाईन तिकीट बुकिंग करणे पसंद करतात.
UTS New Rules : यूटीएसचे हे नवे नियम तुम्हाला माहितीय का?

यूटीएस (UTS) मोबाइल ॲपद्वारे आपण सीझन तिकीट, मासिक पास आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुक करू शकतो. मोबाइल ॲप ऑपरेटिंग सिस्टमच्या Android, IOS आणि Windows आवृत्त्यांसह स्मार्टफोनवर कार्य करते आणि ते विनामूल्य डाउनलोड करता येते. आधी या ॲपमध्ये तिकीट बुकिंगच्या अंतरावर मर्यादा कमी होती. पण आता ती मर्यादा वाढवण्यात आली आहे.

तुम्ही आता यूटीएस मोबाइल ॲपद्वारे उपनगरीय (Suburban) विभागातील स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावरून तिकिटे बुक करू शकता. तसेच गैर-उपनगरीय विभागातील अंतर वाढवून २० किलोमीटर करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी प्रवासी यूटीएस (UTS) या ॲप चा वापर करतात. रेल्वे स्टेशनवरींल तिकीट खिडकीवर लांबच लांब रांग लावण्यापेक्षा लोक या ॲपद्वारे ऑनलाईन तिकीट बुकिंग करणे पसंद करतात. आधी या ॲपवर काही अंतर मर्यादा होत्या, त्यामुळे बहुतेक वेळा प्रवाशांना तिकीट बुकिंग साठी अडथळे येत होते. उपनगरीय ( Suburban ) तिकिटांसाठी अंतराची मर्यादा दोन किलोमीटर होती व गैर-उपनगरीय ( Non-Suburban ) तिकिटांसाठी अंतराची मर्यादा पाच किलोमीटर होती. पण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्धी पत्रक जारी करत वाढवल्याची माहिती दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in