Video : उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी जुहू बीचवर घेतली क्रिकेट खेळण्याची मजा

महायुतीचे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी धामी मुंबईत आले आहेत.
Video : उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी जुहू बीचवर घेतली क्रिकेट खेळण्याची मजा

मुंबई : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज, १३ मे रोजी सकाळी मुंबई येथील जुहू बीचवर बच्चे कंपनीसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. धामींचा बच्चे कंपनीसोबत क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी धामींनी बीचवर योगा करणाऱ्या लोकांशीही संवाद साधला.

महायुतीचे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी धामी मुंबईत आले आहेत. यावेळी निकम यांच्यासाठी पार्लेश्वर रोड, विले पार्ले येथे रविवारी, १२ मे रोजी निकम यांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅली काढली. ही निवडणुका देशाच्या उज्वल भविष्यासाठी, विकसित भारताचा संकल्प, भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनविण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले. इंडिया आघाडीवर टीका करताना धामी म्हणाले, इंडिया आघाडीचा उद्देश देशाच्या हिताचे रक्षण करणे नाही तर, केवळ सत्ता सुरक्षित करणे आणि त्यांच्या कुटुंबांचे रक्षण करणे हा आहे.

निकम यांच्याबद्दल धामी म्हणाले

यावेळी धामींनी न्यायव्यवस्थेतील निकम यांच्या योगदानावर प्रकाश टाकला. निकम यांनी काँग्रेस सरकारच्या काळात दहशतवादी अजमल कसाबला शिक्षा दिली. २० मे रोजी सर्वांनी निकम यांना मतदान करण्याचे आवाहन धामींनी यावेळी केले आणि प्रत्येक मत हे पंतप्रधान मोदींना ताकद देईल, असेही ते यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in