जलविद्युत व तरंगता सौरऊर्जा प्रकल्प खर्चात वाढ; १० कोटींचा खर्च २२ कोटींवर, प्रस्ताव मंजुरीसाठी आज स्थायी समितीत

मध्य वैतरणा प्रकल्पात जलविद्युत व तरंगता सौरऊर्जा प्रकल्पासाठी खर्च १० कोटींवरून वाढून २२ कोटींवर गेला आहे. या वाढीव खर्चाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे.
जलविद्युत व तरंगता सौरऊर्जा प्रकल्प खर्चात वाढ; १० कोटींचा खर्च २२ कोटींवर, प्रस्ताव मंजुरीसाठी आज स्थायी समितीत
जलविद्युत व तरंगता सौरऊर्जा प्रकल्प खर्चात वाढ; १० कोटींचा खर्च २२ कोटींवर, प्रस्ताव मंजुरीसाठी आज स्थायी समितीत
Published on

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय अर्थात मध्य वैतरणा प्रकल्पात जलविद्युत प्रकल्प व तरंगता सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदाराला यापूर्वी देय असलेल्या १० कोटी रुपयांच्या खर्चात आणखीन १२ कोटींची प्रचंड वाढ झाल्याने या प्रकल्पाचा खर्च २२ कोटींवर गेला आहे. दरम्यान, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

या प्रकल्पांतर्गत ऊर्जा वहन व्यवस्थेच्या मार्गाधिकार/ भूसंपादनासाठी आणि काही बदल करून कालावधी वाढविण्यात आल्याने प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याचे सांगण्यात येते.

मुंबईची अतिरिक्त पाण्याची तहान भागविण्यासाठी मुंबई महापालिकेने २५ वर्षांपूर्वी मध्य वैतरणा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रकल्पासाठी विविध परवानग्या घेण्यातच ११ वर्षे गेली आणि तीन वर्षे प्रकल्पाच्या बांधकामात गेली. अखेर १४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईला ४५५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाले.

या धरण प्रकल्पाच्या अंतर्गत ऊर्जा निर्मिती आणि सौरऊर्जा निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, महापालिकेने धरण प्रकल्प पूर्ण झाल्यावर धरणाच्या पाणीसाठ्यात तरंगता सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, गतवर्षापासून पालिकेने तरंगता सौरऊर्जा प्रकल्प राबवला व सौरऊर्जा निर्मितीला प्रारंभदेखील केला.

प्रकल्पामुळे पालिकेच्या विजेच्या खर्चात मोठी बचत

या सौरऊर्जेचा तेथील आवश्यक विजेची गरज भागविण्यासाठी सध्या वापर करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या यापूर्वी विजेच्या वापरासाठी होत असलेल्या लाखो रुपयांच्या खर्चात मोठी बचत झाली आहे. भविष्यातही पालिकेला या सौरऊर्जा आणि विद्युत ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचा लाभ होणार आहे. मात्र, या दोन्ही प्रकल्प खर्चात १२ कोटींची वाढ झाल्याने प्रकल्प खर्च २२ कोटींवर गेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in