रेडी रेकनरसाठी व्हॅल्यू झोन तयार करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

मुंबई : कोणत्या भागात किती रेडी रेकनर दर वाढवायचा याबाबत राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. एखाद्या भागात उच्चभ्रू वर्ग राहत असल्याने त्याठिकाणी रेडी रेकनर दर आकारले जातात. यामुळे सर्वसामान्यांना घर खरेदी करताना आर्थिक फटका बसतो. रेडी रेकनर दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसू नये यासाठी व्हॅल्यू झोन तयार करण्याचे काम सुरू आहे.
रेडी रेकनरसाठी व्हॅल्यू झोन तयार करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
चंद्रशेखर बावनकुळे, संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : कोणत्या भागात किती रेडी रेकनर दर वाढवायचा याबाबत राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. एखाद्या भागात उच्चभ्रू वर्ग राहत असल्याने त्याठिकाणी रेडी रेकनर दर आकारले जातात. यामुळे सर्वसामान्यांना घर खरेदी करताना आर्थिक फटका बसतो. रेडी रेकनर दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसू नये यासाठी व्हॅल्यू झोन तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना, मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

विधान परिषद सदस्य सुनील शिंदे, ॲड. अनिल परब, सचिन अहिर यांनी मालमत्तांच्या खरेदी विक्रीवेळी जमा होणाऱ्या मुद्रांक शुल्क संदर्भात लक्षवेधी सूचना मांडून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती.

सदस्य सुनील शिंदे आणि अनिल परब यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, मुंबईत मिलच्या ठिकाणी इमारती बांधकाम करताना त्यांच्या शेजारी होणाऱ्या म्हाडा आणि एसआरएच्या प्रकल्पांनाही एकच दर लावण्यात येतो. त्यामुळे घर घेणे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले असे सदस्यांचे म्हणणे असेल तर आपल्या तक्रारीची योग्य दखल शासनाने घेतलेली आहे.

logo
marathi.freepressjournal.in