वंचितचा २२ फेब्रुवारी रोजी महापालिकेवर मोर्चा

कुर्ला येथील वंचितच्या कार्यालयामध्ये जवळपास २ वर्षांपासून अंगणवाडीत लहान मुलांना शिक्षण दिले जाते.
वंचितचा २२ फेब्रुवारी रोजी महापालिकेवर मोर्चा
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या एल विभाग कार्यालयातर्फे १५ फेब्रुवारी रोजी कुर्ला नेहरू नगर येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली; मात्र, या कारवाईपूर्वी महानगरपालिकेकडून निष्कासनासंदर्भात कोणतीही नोटीस मिळाली नाही. तसेच, पूर्वसूचनेविना कार्यालय जमीनदोस्त करण्यात आले, असा आरोप वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. पालिकेच्या या कारभाराविरोधात २२ फेब्रुवारी रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे पालिकेच्या एल विभाग कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

कुर्ला येथील वंचितच्या कार्यालयामध्ये जवळपास २ वर्षांपासून अंगणवाडीत लहान मुलांना शिक्षण दिले जाते. त्यानुसार, १५ फेब्रुवारी रोजीही कार्यालयात बालवाडीचे वर्ग सुरू होते; मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस कार्यालयाबाहेर जमा झाले आणि निष्कासनाच्या कारवाईला सुरुवात केली, असा आरोप वंचितच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या कारवाईदरम्यान, बालवाडीत शिकत असलेल्या मुलांपैकी काहीजण किरकोळ जखम झाली. असेही त्यांनी सांगितले. ही कारवाई केवळ बड्या नेत्याच्या सांगण्यावरून तसेच कुर्ला भागात वंचित बहुजन पक्षाचे वाढते प्रस्थ रोखण्यासाठी करण्यात आली आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in