‘वंदे भारत’ लवकरच मुंबई सेंट्रल-अहमदाबाद मार्गावर धावण्याची शक्यता

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या डब्यांची बांधणी चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यात करण्यात येत आहे
‘वंदे भारत’ लवकरच मुंबई सेंट्रल-अहमदाबाद मार्गावर धावण्याची शक्यता

मेक इन इंडिया’अंतर्गत आकाराला आलेली ‘वंदे भारत’ लवकरच पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल-अहमदाबाद मार्गावर धावणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या या मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसऐवजी ही नवीन गाडी चालवण्याचे नियोजन रेल्वे बोर्डाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या योजनेमुळे दोन शहरांदरम्यानचे प्रवास अंतर कमी होण्यास मदत होणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर नुकतीच एक ‘वंदे भारत’ रेल्वे पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या डब्यांची बांधणी चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यात करण्यात येत आहे. जवळपास ४०० वातानुकूलित ‘वंदे भारत’ गाड्यांची बांधणी करण्यात येणार आहे. जीपीएस आधारित ऑडिओ व्हिजुअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असतील. प्रत्येक ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्ये १६ वातानुकूलित डबे असतील. एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार १२८ आहे. सध्या नवी दिल्ली-वाराणसी आणि नवी दिल्ली-कटरा मार्गावर ‘वंदे भारत’ धावत आहे.

दरम्यान, लवकरच मुंबई सेंट्रल -अहमदाबाद मार्गावरही वंदे भारत रेल्वे धावणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत नियोजन सुरु असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. सद्यस्थितीत या गाडीची देखभाल, दुरुस्तीकरीता जोगेश्वरी येथे यंत्रणा उभारण्याचे काम सुरू असून वंदे भारत रेल्वे मुंबई सेंट्रल- अहमदाबाद हे ४९१ किलोमीटर अंतर दर ताशी ७६.५२ किलोमीटर वेगाने धावणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in