

मुंबई : वंदे भारत गाड्यांची मागणी लक्षात घेता रेल्वेने प्रायोगिक तत्वावर वंदे भारत गाड्यांना दौंड आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवरही थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत आणि पुणे- हुबळी-पुणे वंदे भारत या गाड्यांना या दोन्ही स्थानकात थांबे देण्यात येणार आहेत.
उच्च वेग, सुरक्षा मानके आणि आधुनिक प्रवास अनुभव यामुळे वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. २२२२५/२२२२६ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेसला दौंड येथे थांबा राहील. गाडी क्रमांक २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला २४ नोव्हेंबरपासून दौंड स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी दौंड येथे रात्री १०.१३ वाजता पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक २२२२६ सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेसला २४ नोव्हेंबर पासून दौंड स्थानकावर थांबा असेल आणि ही गाडी दौंड येथे सकाळी ८.०८ वाजता पोहोचेल. तसेच २०६७०/ २०६६९ पुणे-हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा किर्लोस्करवाडी येथे राहील.