या प्रकरणात आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाचा हात; युवासेना नेते वरुण सरदेसाईंचा दावा

शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आता राज्याचे राजकारण तापले असून युवासेनेच्या नेते वरुण सरदेसाईंकडून नवा दावा करण्यात आला
या प्रकरणात आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलाचा हात; युवासेना नेते वरुण सरदेसाईंचा दावा
Published on

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी आता राज्यातील राजकारण तापले आहे. अशामध्ये हा व्हिडीओ मॉर्फकरून तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला होता. तसेच, यामागे 'मातोश्री'चा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावरून आता युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, "हा व्हिडीओ आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याने फेसबुकवर लाईव्ह केला होता. त्यामुळे खरा आरोपी तोच असून त्याला अटक झाली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, जर शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ मॉर्फ केला असेल तर मग खरा व्हिडीओ कुठे आहे? असा सवालदेखील त्यांनी विचारला आहे.

वरुण सरदेसाई पुढे म्हणाले की, "मुंबई पोलीस सक्षम असून ते खऱ्या आरोपीला अटक करतील. कारण हा व्हिडीओ आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेच बनवला आहे," असा दावा त्यांनी केला. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वरुण सरदेसाई पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असणाऱ्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर रोज आरोप होत आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर रोज केंद्रीय तपास यंत्रणा कारवाया करत आहेत. मात्र, ते भाजपमध्ये गेल्यावर त्यांना क्लीनचीट मिळते. हे सर्व जनता पाहत असून त्यांना रुचलेले नाही हे कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले." अशी टीका यावेळी भाजप आणि शिंदे गटावर केली.

logo
marathi.freepressjournal.in