वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरून शिंदे गटाने केली हकालपट्टी

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.
वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरून शिंदे गटाने केली हकालपट्टी

शिंदे गटाने शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरून शिंदे गटाने हकालपट्टी केली आहे. वरुण सरदेसाई यांची हकालपट्टी केल्यानंतर शिंदे गटाकडून किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. दुसरीकडे शिंदे गट आमिष आणि दबाव टाकून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या गटात समील होण्यासाठी बाध्य करत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंनी अनेक आमदार, खासदार, महापौर आणि नगरसेवक यांची हकालपट्टी केली होती. त्याचप्रमाणे आता शिंदे गटाने युवासेनेकडून हकालपट्टी करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटाकडून युवासेनेमध्ये किरण साळी यांना महत्त्वाचे पद देण्यात आले आहे. वरुण सरदेसाई यांचा आपल्या कामामध्ये हस्तक्षेप वाढलेला असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची युवासेना राज्य सचिवपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in