Vasai : मुलाच्या छळाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

आपल्याच मुलाकडून सतत होणारी मारहाण व मानसिक त्रासाला कंटाळून वृद्धाने लोकलखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना वसईत घडली.
Vasai : मुलाच्या छळाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या
Vasai : मुलाच्या छळाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या
Published on: 

वसई : आपल्याच मुलाकडून सतत होणारी मारहाण व मानसिक त्रासाला कंटाळून वृद्धाने लोकलखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना वसईत घडली. गॅब्रिअल डॉमिनिक कुटिनो असे मृत वृद्धांचे नाव असून त्यांचा मुलगा शाम व त्याच्या साथीदाराविरोधात भाईंदर लोहमार्ग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गॅब्रिअल कुटीनो हे वसई पश्चिमेतील सांडोर परिसरात वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा शाम हा गेल्या काही वर्षांपासून किरकोळ कारणावरून वृद्ध वडिलांना मारहाण, शिवीगाळ व मानसिक त्रास देत होता. त्रासाला कंटाळून काही काळ गॅब्रिअल हे आपल्या मुलीकडे राहण्यासाठी गेले होते. मात्र, मे २०२६ मध्ये शाम आणि त्याच्या सागर नावाच्या साथीदाराने मध्यस्थी करून त्यांना पुन्हा घरी आणले. मात्र, त्यानंतरही या दोघांनी वृद्धाचा छळ सुरूच ठेवला.

छळाला कंटाळलेल्या कुटीनो यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. २८ सप्टेंबर रोजी वृद्धाने मुलीची भेट घेऊन तिच्याकडे मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, रोख रक्कम आणि एक सुसाईड नोट असलेली पिशवी सोपवली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in