Vasai : न्यायाधीशांच्या कथित गैरवर्तनाविरोधात तीव्र निषेध; कारवाई न झाल्यास पाच जुलैपासून सत्याग्रहाचा इशारा

वसईच्या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयातील महिला न्यायाधीश स्वरूपा नारायण ढोलम यांनी महिला वकील आकांक्षा वर्मा यांच्याशी न्यायालयीन कामकाजादरम्यान कथितरीत्या असभ्य भाषा वापरून गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Vasai : न्यायाधीशांच्या कथित गैरवर्तनाविरोधात तीव्र निषेध; कारवाई न झाल्यास पाच जुलैपासून सत्याग्रहाचा इशारा
Vasai : न्यायाधीशांच्या कथित गैरवर्तनाविरोधात तीव्र निषेध; कारवाई न झाल्यास पाच जुलैपासून सत्याग्रहाचा इशारा'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

वसई : वसईच्या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयातील महिला न्यायाधीश स्वरूपा नारायण ढोलम यांनी महिला वकील आकांक्षा वर्मा यांच्याशी न्यायालयीन कामकाजादरम्यान कथितरीत्या असभ्य भाषा वापरून गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेचा तीव्र निषेध करणारा ठराव वसई बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष नोएल डाबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत संबंधित न्यायाधीशांची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची तातडीने अन्यत्र बदली करण्यात यावी आणि आरोप सिद्ध झाल्यास त्यांना निलंबित करावे, असेही ठरावात नमूद केले आहे.

वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयात ११ जून रोजी कामकाजादरम्यान हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संतापजनक वागणुकीनंतर वकील आकांक्षा वर्मा यांनी त्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालय आणि ठाणे जिल्हा न्यायालयाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, त्यानंतर नोंदणीकृत टपालाद्वारेही याविषयीचे तपशील पाठवले आहेत. बार असोसिएशनच्या सभेत त्यांनी स्वतः उपस्थित राहून आपल्यासोबत घडलेल्या या प्रकाराची माहिती सर्व वकील सदस्यांसमोर मांडली. या ठरावात संबंधित न्यायाधीशांच्या विरोधात यापूर्वीही तक्रारी झाल्याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. सदर ठराव आदेश बनसोडे यांनी मांडला असून विनायक सोमकुवर यांनी त्याला अनुमोदन दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in