Vasai : निरागस बालिकेला रस्त्यात टाकून आईचा पळ; ऐन महिला दिनी धक्कादायक घटना

जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी, देशभरात महिलांचा सन्मान आणि गौरवाचे कार्यक्रम सुरू असताना वसई येथे मात्र एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐन महिला दिनी एका मातेने आपल्या निरागस बालिकेला रस्त्यात टाकून पळ काढल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे शहरात संताप व्यक्त केला जात आहे.
निरागस बालिकेला रस्त्यात टाकून आईचा पळ; ऐन महिला दिनी धक्कादायक घटना
निरागस बालिकेला रस्त्यात टाकून आईचा पळ; ऐन महिला दिनी धक्कादायक घटना
Published on

वसई : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी, देशभरात महिलांचा सन्मान आणि गौरवाचे कार्यक्रम सुरू असताना वसई येथे मात्र एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐन महिला दिनी एका मातेने आपल्या निरागस बालिकेला रस्त्यात टाकून पळ काढल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे शहरात संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका मातेने आपल्या सुमारे १० ते १५ दिवसांच्या तान्ह्या बाळाला रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याची घटना वसई पूर्व येथील वसंत नगरी परिसरात घडली. रविवारी सकाळी स्थानिक नागरिक प्रभात फेरीसाठी बाहेर पडले असताना वसंत नगरी सिग्नलजवळ रस्त्याच्या कोपऱ्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता एका पिशवीत नवजात बालिका आढळून आली.

निरागस बालिकेला रस्त्यात टाकून आईचा पळ
निरागस बालिकेला रस्त्यात टाकून आईचा पळ

स्थानिक नागरिकांनी तात्काळ मणिकपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला तातडीने उपचारासाठी वसईच्या सर डी.एम. पेटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या तपासणीनंतर बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.

यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी बाळाला उमराळे येथील जिल्ह्यच्या महिला बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in