वसईत गरबा खेळणाऱ्या महिलेचा मृत्यू

वसईतील एका परिसरात सुरू असलेल्या नवरात्र उत्सवात बुधवारी रात्री उशिरा दुर्घटना घडली. गरबा खेळत असताना ४५ वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मेघा परमार/पालघर

वसईतील एका परिसरात सुरू असलेल्या नवरात्र उत्सवात बुधवारी (दि. २४) रात्री उशिरा दुर्घटना घडली. गरबा खेळत असताना ४५ वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मयत महिला फाल्गुनी राजेश शाह या ओमनगर परिसरात विघ्नेश्वर मंडळाने आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवात सहभागी झाल्या होत्या. सार्वजनिक उद्यानात

गरबा खेळण्याचा एक फेरा पूर्ण झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा तोल गेला आणि सुमारे ५० सहभागी नागरिकांसमोर त्या जागीच कोसळल्या. मंडळाचे सदस्य आणि त्यांच्या पतीने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथे पुरेशा सुविधा नसल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शाह यांना वाचवता आले नाही.

logo
marathi.freepressjournal.in