वसई : विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी; महिला वकिलाचे मुख्य न्यायमूर्तींना पत्र

शाळेत दहा मिनिटे उशिरा पोहोचल्याच्या कारणावरून सहावीतील विद्यार्थिनीला पाठीवर दप्तर ठेवून शंभर उठाबशा करण्याची शिक्षा देण्यात आली आणि त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वसईत घडली.
वसई : विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी; महिला वकिलाचे मुख्य न्यायमूर्तींना पत्र
Published on

वसई : शाळेत दहा मिनिटे उशिरा पोहोचल्याच्या कारणावरून सहावीतील विद्यार्थिनीला पाठीवर दप्तर ठेवून शंभर उठाबशा करण्याची शिक्षा देण्यात आली आणि त्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वसईत घडली. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी महिला वकील स्वप्ना कोदे यांनी मुख्य न्यायमूर्तींना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे. ८ नोव्हेंबर रोजी सहावीत शिकणारी काजल गौड ही इतर काही विद्यार्थ्यांसह शाळेत उशिरा पोहोचली. शाळेतील संबंधित महिला शिक्षकाने दंड स्वरूपात पाठीवर दप्तर ठेवून १०० उठाबशा काढण्याचे आदेश दिले.

शिक्षेनंतर घरी परतल्यावर काजलला तीव्र पाठदुखी सुरू झाली, प्रथम तिला वसईतील रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर स्थिती गंभीर झाल्याने जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच १४ नोव्हेंबरला तिचा मृत्यू झाला. स्थानिक पोलीस प्राथमिक चौकशी करत असले तरी सद्यस्थितीत गुन्हा नोंदवलेला नाही तसेच कारवाईही झालेले नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in