Vasai Virar ED Case : अनिलकुमार पवार यांच्या अडचणीत वाढ; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

वसई विरारमध्ये डम्पिंग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या ६० एकर जागेवर ४१ अनधिकृत इमारती उभारल्याप्रकरणी माजी आयुक्त अनिल कुमार यांना ईडीने अटक केली आहे.
Vasai Virar ED Case : अनिलकुमार पवार यांच्या अडचणीत वाढ; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Published on

मुंबई : वसई विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यासह नगररचना विभागाचे उपसंचालक निलंबित वाय. एस. रेड्डी, तसेच बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता आणि अरूण गुप्ता या चौघांना पीएमएलए कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे या चौघांना आता ३ सप्टेंबरपर्यंत कोठडीत राहावे लागणार आहे.

वसई विरारमध्ये डम्पिंग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या ६० एकर जागेवर ४१ अनधिकृत इमारती उभारल्याप्रकरणी माजी आयुक्त अनिल कुमार यांना ईडीने अटक केली आहे. या प्रकरणात अनेक सनदी लेखापाल, वास्तुविशारद, कनिष्ठ अभियंते, ठेकेदार, बडे अधिकारी आणि अनेक एजंट सध्या ईडीच्या रडारवर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ईडीने यासंदर्भात अनेक वेळा छापेमारी केली तसेच आरोपींचे जबाब नोंदवत संबंधित सर्व पुरावे गोळा केले.

logo
marathi.freepressjournal.in