वसई-विरार महापालिकेत आरक्षण सोडत जाहीर; ५८ जागा महिलांसाठी राखीव

वसई-विरार शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर झाली. एकूण ११५ जागांपैकी तब्बल ५८ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने या निवडणुकीत महिला उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
वसई-विरार महापालिकेत आरक्षण सोडत जाहीर; ५८ जागा महिलांसाठी राखीव
Published on

अनिलराज रोकडे/वसई

वसई-विरार शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर झाली. एकूण ११५ जागांपैकी तब्बल ५८ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने या निवडणुकीत महिला उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महिला आरक्षण आणि राखीव जागांमुळे सर्वसाधारण गटातील अनेक पुरुष उमेदवारांना मोठा फटका बसला आहे.

आरक्षण सोडतीनुसार २९ प्रभागांपैकी १७ प्रभागात सर्वसाधारण पुरुषांसाठी केवळ एकाच जागेची संधी उपलब्ध झाली आहे, तर प्रभाग क्रमांक २० मध्ये सर्वसाधारण पुरुष उमेदवाराला एकही जागा उपलब्ध नाही. ही सोडत विरार पश्चिम येथील महापालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते पार पडली.

यावेळी प्रभारी आयुक्त व जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त स्वाती देशपांडे, अजित मुठे, अर्चना दिवे, सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूण आरक्षण रचना

  • एकूण जागा : ११५

  • एससी : ५ जागा

  • एसटी : ५ जागा

  • ओबीसी : ३१ जागा

  • सर्वसाधारण : ७४ जागा

  • महिला आरक्षण (५०%) : ५८ जागा

आरक्षण १ जुलै २०२५ पर्यंतच्या मतदार याद्यांवर आधारित निश्चित करण्यात आले.

सर्वसाधारण पुरुषांना मोठा धक्का

आरक्षण सोडतीनंतर अनेक प्रभागांमध्ये सर्वसाधारण पुरुष उमेदवारांसाठी जागा अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे. २९ पैकी १७ प्रभागांमध्ये सर्वसाधारण गटातील पुरुषांसाठी फक्त एकच जागा

प्रभाग क्रमांक २० मध्ये एकही जागा नाही

प्रभाग क्रमांक २० चे विश्लेषण :

  • अ – आरक्षित (अनुसूचित जाती)

  • ब – आरक्षित (अनुसूचित जमाती)

  • क – OBC (महिला)

  • ड – सर्वसाधारण (महिला)

म्हणजे या प्रभागात सर्वसाधारण पुरुष उमेदवाराला पूर्णतः संधी नाही. अनेक संभाव्य उमेदवारांना आता शेजारील किंवा पर्यायी प्रभाग शोधावा लागणार आहे.

महिलांसाठी प्रवर्गनिहाय राखीव जागा

१) अनुसूचित जाती (SC महिला): १४-अ, १-अ, १९-अ

२) अनुसूचित जमाती (ST महिला): २५-अ, १९-ब, २७-अ

३) OBC महिला (महत्त्वाच्या १५ जागा): १२-अ, २३-अ, १-ब, २०-क, २१-ब, ४-अ, ७-अ, ६-अ, ९-अ,२-अ, १५-अ, २६-अ, १३-अ, १७-अ, ८-अ, २९-अ

४) सर्वसाधारण (General महिला): १-क, २-ब, ३-ब, ३-क, ४-ब, ५-ब, ५-क, ६-ब, ७-ब, ८-ब, ९-ब ९-ब १०-क, ११-क, १२-क, १३-ब, १४-क, १५-ब, १६-ब, १६-क, १७-ब, १८-ब, १८-क, २०-ड, २१-क, २२-ब, २२-क, २३-क, २४-ब, २४-क, २५-क, २६-ब, २७-क, २८-ब, २८-क, २९-ब

logo
marathi.freepressjournal.in